आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ आश्रमातील चिमुकल्यांसोबत दिवाळी केली साजरी

Foto
पैठण (प्रतिनिधी): तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथ आश्रमातील चिमुकल्यांची दिवाळी विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आली.

खासदार संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पैठणचे आमदार विलास भूमरे यांच्या पुढाकाराने सहा वर्षांपासून यंदाही विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रवाह परिवार अनाथ आश्रम, टाकळी (अंबड) येथील चिमुकल्यांची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी केली. 

या उपक्रमांतर्गत, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रवाह परिवारातील बालकांसाठी त्यांच्या आवडीनुसार, पैठण येथील सुप्रसिद्ध श्रीराम नक्स तर्फे या दुकानातून नवे ड्रेस खरेदी करून दिले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे. या दिवाळी आनंदोत्सव प्रसंगी वर्षा विलास भूमरे, ज्योती काकडे, वैशाली परदेशी, हेमा गोर्डे, कविता शिंदे, भारती मिटकर, आयोध्या चौधरी, शारदा गोरे, शेखर शिंदे, शहादेव लोहारे, रामेश्वर गोर्डे, सतीश आंधळे, राजेंद्र वाघमोडे, मनोज गायके, अजित पगारे, आबासाहेब पाटील गिरगे, राहुल कबाडे, गणेश वाघमोडे, प्रणित निकाळजे, भारत कासोदे, असलम पठाण, ऋषी दहिभाते, कृषी तांबटकर, दिनेश खंडागळे आणि आशिष गिरे यांची विशेष उपस्थिती होती. 

याप्रसंगी उपस्थित सर्वांनी चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या समाजप्रेरित उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव बळकट होत आहे. हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.